• 07184-295257

कार्यक्रम

Home //कार्यक्रम

सामाजिक न्याय विभाग वर्धापन दिन कार्यक्रम (दिनांक 15 ऑक्टोंबर, 2022)

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे स्थापनेस 90 वर्षे पुणे होत असल्यामुळे संपूर्ण राज्यभर सदर वर्धापन दिनानिमित्त दिनांक 15 ऑक्टोंबर, 2022 रोजी राज्यात विविध कार्यक्रम करण्याचे मा.आयुक्त, समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सूचित केलेले आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने भंडारा जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर वर्धापन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय, भवन येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे या कार्यालयाचे अधिनस्त शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व वसतिगृहात प्रवेशीत विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हयात कार्यरत वृध्दाश्रम, अंध-अपंग विद्यालये, व अनुदानित वसतिगृहांमध्येसुध्दा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

“ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा” (दिनांक 17 सप्टेंबर, 2022 ते 02 ऑक्टोंबर, 2022)

भंडारा येथे जागतिक स्मृतिभ्रंश दिन साजरा….

“ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा” (दिनांक 17 सप्टेंबर, 2022 ते 02 ऑक्टोंबर, 2022)  अंतर्गत भारतीय औषधीअनुसंधान संस्था. भंडारा येथे जागतिक स्मृतिभ्रंश दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुकेशीनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुहास गजभिये मानसिक रोग तज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा , डॉ.भगत सर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा , डॉ.भांडारकर सर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा  डॉएल जी रामटेके  भंडारा, डॉ. रवींद्र वानखेडे संस्थापक भारतीय औषधी अनुसंधान संस्था. डॉक्टर ज्योती वानखडे सचिव भारतीय औषधी अनुसंधान संस्था श्री पाथोडे सर लेखपाल समाज कल्याण भंडारा, श्री पवन अहिरकर श्री इंद्रजीत आमटे वृद्धाश्रमातील कर्मचारी डॉ. अश्विनी लांडगे प्रिया निकोसे, सुलभा स्कॉट , वर्षा पोहरे उपस्थित होते.

भंडारा येथे जागतिक स्मृतिभ्रंश दिन साजरा (दिनांक 21 सप्टेंबर, 2022)

आज दिनांक 21.09.2022 रोजी “ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा” (दिनांक 17 सप्टेंबर, 2022 ते 02 ऑक्टोंबर, 2022)  अंतर्गत भारतीय औषधीअनुसंधान संस्था. भंडारा येथे जागतिक स्मृतिभ्रंश दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.