• 07184-295257

About Us

Home //About Us

१९२८

शासनातर्फे स्टार्ट समितीची स्थापना. सदर समितीमध्ये एकूण १० सदस्यांचा समावेश सदर समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश (शासन निर्णय क्रमांक ४३७० , दि. ५ नोव्हेंबर, १९२८.)


१९३०

स्टार्ट समितीचा अहवाल शासनस सादर


१९३२-मागास समाजासाठी बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री. ओ. एच. बी. स्टार्ट, आय.सी.एस.यांची या खात्याचे पहिले संचालक म्हणून नियुक्ती झाली.


१९४७

बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटच्या संचालकांचे कार्यालय मुंबई येथे होते. ते मुंबई येथून पुणे येथे स्थालांतरित करण्यात आले. राज्याचे उद्योग, मत्स्यव्यवसाय आणि मागासवर्गीयांचे कल्याण या विभागाचे मंत्री मा. श्री.गणपती देवजी तपासे यांच्या हस्ते दिनांक ९ ऑगस्ट १९४७ रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.


१९५७

पुणे येथे समाजकल्याण संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. २८५७ डी.दिनांक २३ सप्टेंबर १९५७ अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करून या संचालनालयाची स्थापना झाली. यात समाजकल्याण, महिला व बाल विकास, आदिवासी विकास, विजाभज, इतर मागासवर्ग व अपंग कल्याण हे सारे विभाग एकत्रित झालेत.


१९७२

या वर्षी समाजकल्यान व शिक्षण हे वेगडे करण्यात आले व स्वतंत्र समाजकल्यान विभागाची निर्मिती झाली


१९८२

आदिवासी विकास विभाग स्वतंत्र करण्यात आला.


१९९१

महिलाव बाल विकास विभाग स्वतंत्र करण्यात आला.


१९९९

मार्च, १९९९ मध्ये समाजकल्याण विभागाचे विभाजन करून विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.


२०००

अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली.


२००१

सन २००१ मध्ये वीमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागसवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालयाची निर्मिती करण्यात आली.